अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर,छगन भुजबळ,नरहरी झिरवाळ,धनंजय मुंडे...

मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

यादी जाहीर करताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, "पहिल्या यादीत विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिले आहे. दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल." 

या यादीत छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून, धनंजय मुंडे यांना परळीमधून, आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे.

नवाब मलिक आणि सुनील टिंगरे यांचे नाव वगळले

या यादीतून नवाब मलिक आणि वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर मतदारसंघ आणि सुनील टिंगरे यांचा वडगाव शेरी मतदारसंघ होता, पण यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक-शेख यांचेही नाव या यादीत नाही.

राष्ट्रवादीच्या महिलांना प्राधान्य

अजित पवार गटाने पहिल्या यादीत चार महिलांना उमेदवारी दिली आहे. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, देवळालीमधून सरोज आहिरे, अमरावती शहरमधून सुलभा खोडके, आणि पाथरीमधून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुका आणि उमेदवारीची स्पर्धा

राज्यभरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून, पहिल्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यावर अनेकांचे लक्ष लागले होते.या यादीत सुनील टिंगरे आणि नवाब मलिक यांची नावे नसल्यामुळे दुसऱ्या यादीत त्यांना संधी मिळेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पहिल्या यादीत 38 नावांची घोषणा :

1. अदिती तटकरे - श्रीवर्धन  

2. अण्णा बनसोडे - पिंपरी  

3. आशुतोष काळे - कोपरगाव  

4. इंद्रनील नाईक - पुसद  

5. छगन भुजबळ - येवला  

6. चेतन तुपे - हडपसर  

7. चंद्रकांत उर्फ राजू नवघरे - बसमत  

8. धर्मराव बाबा आत्राम - अहेरी  

9. धनंजय मुंडे - परळी  

10. दत्तात्रय भरणे - इंदापूर  

11. दिलीप मोहिते - खेळ आळंदी  

12. दिलीप वळसे पाटील - आंबेगाव  

13. नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा  

14. नरहरी झिरवाळ - दिंडोरी  

15. निर्मला विटेकर - पाथरी  

16. नितीन पवार - कळवण  

17. प्रकाश सोळंके - माजलगाव  

18. बाबासाहेब पाटील - अहमदपूर  

19. भरत गावित - नवापूर  

20. मकरंद पाटील - वाई  

21. माणिकराव कोकाटे - सिन्नर  

22. रामकुमार बडोले - अर्जुनी मोरगाव  

23. राजेश पाटील - चंदगड  

24. राजू कारेमोरे - तुमसर  

25. संग्राम जगताप - अहमदनगर शहर  

26. सरोज आहिरे - देवळाली  

27. संजय बनसोडे - उद् गीर  

28. सुलभा खोकडे - अमरावती शहर  

29. सुनील शेळके - मावळ  

30. सुरेश निकम - चिपळूण  

31. धौतराव दरोडा - शहापूर  

32. हसन मुश्रीफ - कागल  

33. हिरामण खोसकर - इगतपुरी  

34. यशवंत माने - मोहोळ  

35. अतुल बेनके - जुन्नर  

36. किरण लहामटे - अकोले  

37. अजित पवार - बारामती  

38. दौलत दरोडा - शहापूर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने