शिक्षणाचा दर्जा घसरला? ३५ गुणाऐवजी २० गुणांवर पास होण्याची संधी,महाराष्ट्र मंडळाचा मोठा निर्णय

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये कायमच भीतीची भावना असते. या दोन विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यक असतात, पण अनेक विद्यार्थ्यांसाठी हा टप्पा ओलांडणे कठीण जाते. आता महाराष्ट्र राज्य मंडळाने विद्यार्थ्यांची ही भीती कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार, गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 गुणांऐवजी 20 गुण मिळाले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतील. मात्र, या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर एक विशेष शेरा दिला जाईल. यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान या विषयांत उच्च शिक्षण घ्यायचे नाही, त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी कला किंवा इतर शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतो.

शिक्षण क्षेत्रात प्रतिक्रिया

या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय विद्यार्थ्यांची करिअर घडवण्यात अडथळा ठरू शकतो. पुढच्या काळात तंत्रज्ञानाधारित नोकऱ्यांसाठी गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे विषय असतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याऐवजी या विषयांना विद्यार्थ्यांची गोडी कशी लागेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

मात्र, या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये फक्त पास न करता, त्यांचा गोडी निर्माण करण्यासाठी आणि अधिक ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गणित आणि विज्ञानाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थ्यांसाठी दोन पर्याय

विद्यार्थ्यांसाठी दोन पर्याय असणार आहेत – एकतर प्रमाणपत्र घेऊन अकरावीला प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान शाखांमध्ये करिअर घडवायचे नाही, त्यांना या बदलाचा फायदा होईल. शिक्षणाच्या प्रवासात अडकून न राहता ते इतर शाखांत प्रवेश घेऊन आपले शिक्षण पुढे चालू ठेवू शकतात.

मात्र, शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांना फक्त पास होण्याऐवजी, त्यांच्यात या विषयांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविणे गरजेचे आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावला जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार केले जाऊ शकते.हा बदल महाराष्ट्र मंडळाच्या शिक्षण धोरणात एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने