shirpur :चुनिलाल पावरा सर यांना ज्ञानदीप आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०२४ प्राप्त

ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी वार रविवार सकाळी 11 वाजता एस एम पटेल मेमोरियल हॉल फार्मसी ग्राउंड शिरपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

चुनिलाल पावरा सर हे  मुकेश आर पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मनोहर वाघ सर आणि अध्यक्ष योगेश्वर मोरे सर यांनी अर्थक परिश्रम घेतले.


ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी शिरपूर यांच्यामार्फत आयोजित विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये चुनिलाल पावरा यांना आदर्श क्रीडा शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पुरस्काराच्या प्रस्तावामधून एकूण 28 प्रस्ताव आले होते त्यामधून 28 प्रस्तावांची पडताळणी करून निवड चाचणी समितीने चुनीलाल पावरा यांचे  कार्याचे दखल घेत त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरविले दिनांक 15 सप्टेंबर रोजी एस एम पटेल हॉल शिरपूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मनोहर वाघ सर अध्यक्ष योगेश्वर मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने प्रयत्नांनी विविध पुरस्काराचे वितरण केले गेले विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करत  पुरस्कार दिले गेले  क्रीडा लोकसेवा समाजसेवा कला शिक्षण अशा विविध प्रकारचे पुरस्काराचे वितरण केले गेले 

चुनिलाल शिवलाल पावरा हे एक प्रेरणादायक व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांच्या जीवनात अनेक यश संपादन केले आहे. त्यांचे शिक्षण डी. फार्मसी, बी.ए., आणि बी.पी.एड मध्ये झाले आहे, आणि त्यांनी त्यांच्या खेळाच्या क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ते एक क्रीडा शिक्षक देखील आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे, जसे की आदिवासी रत्न पुरस्कार, युथ आयकॉन अवॉर्ड, आदर्श युवा पुरस्कार, आणि नॅशनल कबड्डी खिलाड़ी म्हणून ओळखले जाते.  

चुनिलाल शिवलाल पावरा यांनी त्यांच्या जीवनात अनेक यश संपादन केले आहे, ज्यात चित्रपटांमध्ये अभिनय करणे, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणे आणि खेळाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणे यांचा समावेश आहे. ते एक प्रेरणा म्हणून पाहिले जातात आणि त्यांच्या यशाने त्यांना एक आदर्श व्यक्ती बनवले आहे.

त्यांच्या यशांमध्ये हे समाविष्ट आहे:

- आदिवासी रत्न पुरस्कार (२०१९)

- युथ आयकॉन अवॉर्ड (२०१७)

- आदर्श युवा पुरस्कार (२०२१)

- बॉलिवुडची सुभाष घईची विजेता मराठी चित्रपटातील खिलाडीची भूमिका

- नॅशनल कबड्डी खेळाडू

- स्टेट लेव्हल बेसबॉल

- All India ज्युनियर jkl कबड्डी लीग पुणे पायरट टीम कॅप्टन

- फुलपाखरू सीरियल मराठी कॉलेज स्टूडेंट रोल

- संभाजी महाराज सीरियल मध्ये मावळ्याचा रोल 

- बाळु मामा सिरियल मध्ये गावकऱ्याचा रोल

- जस्ट कबड्डी लीग दिल्ली दमदार टीम २०१७ निवड

- jkl लीग २०१८ गुजरात वॉरियर्स टीम मध्ये निवड

- २०१९ कॅप्टन पुणे पायरट विनर टीम

- युवा कबड्डी महाराष्ट्र टेकनिकल हेड

- बिरसा एज्युकेशन हेड

- समाजभूषण पुरस्कार जाहीर

- नॅशनल प्राइड अवॉर्ड २०२३

- टेनिस बॉल क्रिकेट स्टेट लेव्हल महाराष्ट्र टीम कोच

आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर चुनीलाल पावरा यांनी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी चे सर्व निवड  समिती अध्यक्ष योगेश्वर मोरे सर कार्याध्यक्ष मनोहर वाघ सर आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने