दहिवद फार्मसी महाविद्यालयातर्फे गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न

दहिवद, दि. १२ सप्टेंबर २०२४

दहिवद: येथील हॉनरेबल टी.एस.बी महाविद्यालय दहिवद येथे गणपती विसर्जन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी महाविदयालयतर्फे मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला मोठ्या जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.

मिरवणूकची सुरुवात दहिवद फार्मसी महाविद्यालय येथून रिक्रेशन गार्डन शिरपूर, करवंद नाका, आशीर्वाद हॉस्पिटल करत पुढे संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर यांच्या सूधीनी निवासस्थानी येथे पोहोचला, यावेळी मिरवणूक थांबवून गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ होत अरुणावती नदीपर्यंत पोहचली व गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

या मिरवणुकीत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धिरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. डॉ. चेतन भावसार, प्रा. स्वप्नील पाटील, वैशाली पाटील, नम्रता माळी, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड, विशाल माळी, अतुल चौधरी, अर्चना वाडीले, धर्मजित पावरा, रितिका माळी, सुनैना धनगर, कविता सोनवणे, हेमंत बोरसे, जगन पावरा, कपिल पावरा, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने