धनगर आरक्षण दिल्यास मंत्रीपद सोडणार,मंत्री धर्मराव आत्राम सरकारविरोधात आक्रमक

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या भटक्या जमातीत समाविष्ट असलेल्या धनगर समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची जोरदार मागणी केली आहे. मात्र, आदिवासी नेत्यांकडून याला तीव्र विरोध होत आहे.

धर्मराव आत्राम यांची ठाम भूमिका

महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण दिल्यास आपला राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. चार वेळा अनुसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आत्राम यांची ही घोषणा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे.सध्या महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले, तर ते आपला मंत्रिपदाचा राजीनामा देतील. 

धनगर समाजाची ही मागणी नविन नाही, पण आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून त्यांच्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. याशिवाय, धनगड आणि धनगर या दोन जातींमध्ये केवळ शाब्दिक फरक आहे, असे स्पष्ट करणारा शासन निर्णय काढण्याची जोरदार चर्चा आहे.

आदिवासी नेत्यांकडून तीव्र विरोध

मात्र, आदिवासी नेत्यांकडून सरकारच्या या पावलांचा तीव्र विरोध होतो आहे. आदिवासी समाजाचे आमदार आणि खासदार यांनी जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दिले गेले, तर ते राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी तर २५ आमदार आणि चार खासदार राजीनामे देऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

सरकारवर दबाव

धनगर समाजाने मात्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलनं, उपोषणं आणि मोर्चे सुरू आहेत. या मागणीचा आदिवासी समाजाकडून विरोध होत असला तरी, धनगर समाजाने आपल्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील वातावरण आता या मुद्द्यावर तापू लागले आहे. सरकारला आता धनगर आरक्षणावर त्वरित निर्णय घेणे भाग आहे, अन्यथा या वादाचा परिणाम निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने