शिरपूर, दि. २५ सप्टेंबर: दहिवद फार्मसी महाविद्यालयात “जागतिक औषधनिर्माता दिन” साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अधिव्याख्याता म्हणून तुषार बी जैन, प्रेसिडेंट शिरपूर तालुका केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन, स्वप्निल पाटील चेअरमन शिरपूर तालुका केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन तसेच संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर, डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. तुषार साळुंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. अधिव्येक्ते तुषार जैन यांनी औषधनिर्मात्याने रुग्णांना चांगली, दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे. तसेच आधुनिक आर्टिफिशियल इंजीनियरिंगच्या उपयोगाने भविष्यात रुग्णांना कशाप्रकारे मदत करता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. धीरज बाविस्कर म्हणाले, औषधनिर्मात्याचे काम फक्त डॉक्टरांची चिट्ठी वाचून औषध देण्यापुरता नसून नवीन औषधांचे संशोधन, औषधांच्या चाचण्या आणि औषधांबद्दल समुपदेशन असा व्यापक झाला आहे. फार्मासिस्ट आपले सर्व काम लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन करतो. दहिवद गावातून भव्य अशी औषधी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीतुन लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस या विषयावर पथनाट्ये सादर करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील वैधकीय अधिकाऱ्यांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. गावातील मेडिकल व्यावसाईकाना पुष्प गुच्छ देऊन फार्मसी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैशाली पाटील, प्रा. अतुल चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा निकम या विदयार्थीनीने केले तर आभार जावेद खाटीक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल माळी, महिमा पाटील, रितिका माळी, अर्चना वाडिले, नितीन पाटील, सुरेभसिंग राठोड, धर्मजित पावरा, जगण, पावरा, हेमंत बोरसे, कपिल साळुंखे, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा, कविता सोनवणे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.