आदिवासी विकास विभागा अंतर्गत विविध पदांची भरती

* आदिवासी विकास विभाग भरती *

आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी सरळसेवेची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये आणि वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२ दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ च्या अधीन ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक (वरिष्ठ), लघुटंकलेखक, गृहपाल (स्त्री/पुरुष), संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्यलिपिक (सांख्यिकी), वरिष्ठ लिपिक (सांख्यिकी), कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात क्रमांक : आस्था-पद भरती 2024/प्र.क्र. 59/का.2 (2)/नाशिक

एकूण जागा : ६११ 

अर्ज प्रक्रिया:

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज सादर करता येतील. भरती प्रक्रियेतील सर्व सूचना व महत्त्वाचे अपडेट्स देखील या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांनी या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक आहे, कारण पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.

पदाचे नाव व पद संख्या :

पद क्रमांक. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2 संशोधन सहाय्यक 19
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4 आदिवासी विकास निरीक्षक 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6 लघुटंकलेखक 10
7 गृहपाल (पुरुष) 62
8 गृहपाल (स्त्री) 29
9 अधीक्षक (स्त्री) 55 
10 अधीक्षक (पुरुष) 29
11 ग्रंथपाल  48 
12 सहाय्यक ग्रंथपाल 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक 30
14 प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16 उच्चश्रेणी लघुलेखक 03
17 निम्नश्रेणी लघुलेखक 14
एकूण  611
 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1- कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी 
पद क्र. 2 ते 5 - पदवीधर 
पद क्र.6 - (a)दहावी उत्तीर्ण  (b)लघुलेखण 80 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनीट व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनीट
पद क्र. 7 ते 10  - मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकल्याण प्रशासन किंवा समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी 
पद क्र. 11 व 12  - (a)दहावी पास  (b)ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र 
पद क्र. 13 - दहावी पास 
पद क्र.14 - (a)बारावी पास (b)मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदवी किंवा प्रमाणपत्र (c) 03 वर्षे अनुभव 
पद क्र. 15 - कोणत्याही शाखेतील पदवी 
पद क्र .16 - (a)दहावी उत्तीर्ण (b)मराठी व इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रती मिनीट (c)इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनीट व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनीट (d)MS-CIT
पद क्र .17 - (a)दहावी उत्तीर्ण (b)मराठी व इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रती मिनीट (c)इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनीट व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनीट (d)MS-CIT


नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02/11/2024
परीक्षा दिनांक : अधिकृत वेबसाइट वर लवकरच कळवण्यात येईल 

जाहिरात PDF Click Here
येथे अर्ज करा Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here
नोकरी अपडेट ग्रुप Join Here
 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने