मुंबईतील भायखळा परिसरात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता हा हल्ला झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला
भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे कुर्मी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पोलिसांनी तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरु असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस सध्या घटनास्थळी असून पंचनामा करत आहेत, पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कुर्मी समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तपास सुरू
या घटनेनंतर कुर्मी यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
समीर भुजबळ कुटुंबाची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, ते कुर्मी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. अजित पवार गटातील तालुकाध्यक्षाच्या हत्येने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे राजकीय परिणाम देखील दिसू शकतात.
पोलीस सध्या हत्येमागील सर्व शक्यतेचा तपास करत असून, कुर्मी यांचा कोणाशी काही वाद किंवा शत्रुत्व होते का, याचीही चौकशी करत आहेत.