अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना १५ दिवसांचा कारावास,भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईच्या माझगाव सत्र न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवत १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हा खटला दाखल केला होता. संजय राऊत यांनी मीरा-भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ज्याला सोमय्या यांनी बदनामीकारक ठरवून न्यायालयात दावा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालयाच्या घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सांगितले की, "मी भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते. हे आरोप सर्वात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केले होते. तसेच, या भ्रष्टाचारविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पत्र लिहिले होते."

संजय राऊतांची प्रतिक्रिया:

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी न्यायव्यवस्था आणि भाजपा दोन्हीवर टीका केली. "देशातील सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात, तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना न्याय कसा मिळेल?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नव्हता, हा आरोप तेथील विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता."

राऊत यांनी असा दावा केला की, त्यांनी या प्रकरणातील पुरावे सादर केले होते, परंतु तरीही त्यांना दोषी ठरवण्यात आले. "न्याय व्यवस्थेचं संगीकरण झालं आहे," असं ते म्हणाले. ते वरच्या न्यायालयात अपील करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

न्यायालयाचा निर्णय आणि राऊतांची प्रतिक्रिया

माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "न्यायव्यवस्था संघीकरणाच्या प्रभावाखाली आहे. तरीही आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आमच्याकडे पुरावे असून आम्ही उच्च न्यायालयात अपील करू." ते पुढे म्हणाले, "पंधरा दिवस काय, पंधरा वर्षेही शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलणे थांबवणार नाही."

सरकारवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, "जेव्हा देशाचे सरन्यायाधीश पंतप्रधानांसोबत गणपतीचे मोदक खातात, तेव्हा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं." ते पुढे म्हणाले की, "विधानसभेआधी भाजपला मला तुरुंगात टाकायचे आहे, कारण मी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय."संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, ते उच्च न्यायालयात अपील करतील आणि न्याय मिळवण्यासाठी लढत राहतील.राज्याच्या राजकारणात या घटनेची मोठी चर्चा होत आहे, आणि या प्रकरणाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने