पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाई दुकानात चोरी; बाकरवडी व रोख रक्कम गायब

पुणे, २७ ऑक्टोबर: दिवाळीच्या सणाच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास औंध-बाणेर रोडवरील चितळे बंधू मिठाई दुकानात चोरांनी शटर उचकटून प्रवेश केला आणि १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, चितळे बंधूंच्या खास बाकरवडीचीही चोरी झाली आहे. या चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चोरीची घटना कशी घडली?

बाणेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरांनी चितळे बंधूंच्या दुकानात प्रवेश मिळवला. शटर लॉक केलेले नसल्याने चोरांना ते सहज उघडता आले. चोरांनी गल्ल्यातील रोकड हिसकावून घेतली आणि बाकरवडीसह इतर काही पदार्थांचीही चोरी केली. चोरांनी तोंड झाकले असल्यामुळे त्यांच्या ओळखीचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला गती

चितळे बंधू मिठाई दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीच्या घटनेचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी चोरांचा माग काढण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेच्या तपासात कामगारांपैकी कोणाचाही सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत, कारण चोरांनी शटर लॉक नसल्याची माहिती मिळवून ही चोरी केली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दुकानदारांमध्ये चर्चा वाढली

पुणे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मिठाई ब्रँड असल्याने, या घटनेवर समाजमाध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी दिवाळीच्या सणात दुकानांतील रोकड आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. खासकरून दिवाळीच्या गर्दीत चोरांचा डाव साधण्याच्या घटनांची शक्यता अधिक असते.

घरी असलेल्या मौल्यवान वस्तूंची व दागदागिन्यांची घ्या काळजी

दिवाळीच्या काळात नागरिक घरात दागदागिने आणि रोख रक्कम ठेवत असल्याने, या गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. शक्य असल्यास मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

चितळे बंधूंच्या दुकानावर यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या

चितळे बंधू मिठाई दुकानाचे पुण्यातील विविध शाखांवर यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. येरवडा आणि कोंढवा येथेही मिठाईच्या दुकानांमधील चोरांच्या घटनांनी चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे ही चोरीची घटना पोलिसांसाठी विशेषतः आव्हानात्मक आहे.बाणेर पोलिसांनी चोरीच्या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने