विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश,हरियाणाच्या राजकारणात मोठी घडामोड

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तीच्या मैदानात आपलं दमदार अस्तित्व दाखवणारे दोन आघाडीचे कुस्तीपटू, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया, यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला हक्क दाखवून दिला होता, पण आता ते राजकीय मैदानात उतरणार आहेत.

Image Source - www.x.com

काँग्रेसमधील प्रवेशाची पार्श्वभूमी

महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेस प्रवेश हा हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरला आहे. या दोघांनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला. असे सांगितले जाते की, हरियाणातील काही ठराविक मतदारसंघांमधून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

विनेश फोगाट व बजरंग पुनिया दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामुळे चर्चेत आले होते त्यानंतर विनेश फोगाट ही पॅरिस ओलंपिक मध्ये 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने बाहेर पडली होती त्यावेळी ती मोठा चर्चेचा विषय बनली होती.त्यानंतर आता विनेशने भारतीय रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विनेश फुगाट व बजरंग पुनिया यांनी राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली.या दोघांच्या प्रवेशामुळे हरियानाच्या राजकारणात कितपत बदल घडेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

विनेश फोगटचं अपात्र ठरणं आणि राजकीय प्रवेश

अगदी अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचं वजन अवघं १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे ती अपात्र ठरली होती. त्यामुळे तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी गमवावी लागली होती. मात्र, या अपयशानंतर तिने राजकारणाच्या मैदानात उडी घेतली आहे. काही आठवड्यांपूर्वी ती कुस्ती फेडरेशनमध्ये होणाऱ्या अन्यायाविरोधात साक्षी मलिकसह आंदोलनात सहभागी झाली होती. त्यामुळे तिचा राजकीय प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. 

बजरंग पुनियाचा राजकीय डाव

बजरंग पुनियाही विनेशसोबत काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. त्याला पक्षात एखादं महत्त्वाचं पद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजरंगने देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यामुळे त्याचा हा राजकीय प्रवास महत्त्वाचा मानला जात आहे. त्याला यावेळी काँग्रेसचा स्टार प्रचारक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधींच्या भेटीनंतर मोठी घोषणा

राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतरच विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हरियाणातील राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. या दोघांनी राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या संभाव्य उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे.कुस्तीपटूंचा हा राजकीय प्रवेश काँग्रेससाठी नवा संधीच्या दारं उघडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने