प्रतिनिधी दि. 7 सप्टेंबर 2024
शिरपूर (जि. धुळे) दहिवद येथील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालयात श्री गणपती बाप्पाचे ५ दिवसांसाठी आगमन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आला रे आला गणपती आला, एक दोन तीन चार गणपती बाप्पाच्या जय जय कार, मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया चे घोषणा देत गणपतीचे स्वागत केले. यानंतर गणपती बाप्पाची स्थापना व आरतीच्या मान मा. संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. चेतन भावसार, प्रा. स्वप्नील पाटील, वैशाली पाटील, नम्रता माळी, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड, धर्मजित पावरा, विशाल माळी, अतुल चौधरी, अर्चना वाडीले, कविता सोनवणे, महिमा पाटील, सुनैना धनगर, रितिका माळी, हेमंत बोरसे, जगन पावरा, कपिल साळुंखे, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
Others