अखेर पूजा खेडकर यांची सरकारी नोकरीतून हकालपट्टी,IAS सेवेतून केले बडतर्फ:केंद्र सरकारची मोठी कारवाई

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त घटनांनंतर आणि UPSCच्या निर्णयानंतर, केंद्र सरकारने शनिवारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ केले आहे. खेडकर यांनी ओबीसी आणि दिव्यांगता कोट्याचा गैरवापर करत यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत अयोग्य पद्धतीने प्रवेश मिळवला होता, अशी गंभीर आरोपांमुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विविध दावे केले होते, परंतु तपासादरम्यान त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले. यामुळे यूपीएससीने ३१ जुलै रोजी खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेत बसण्यास बंदी घातली. आता केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, १९५४ च्या नियम १२ अंतर्गत खेडकर यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे.

खेडकर यांच्यावर बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी वारंवार नावं बदलून आणि खोटी कागदपत्रे सादर करून यूपीएससीची फसवणूक केल्याचा दावा आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी अरेरावी केल्याचे आरोप झाले होते. या सर्व घटनांमुळे खेडकर यांची इमेज आणखी मलीन झाली.

सरकारी नियमांच्या उल्लंघनामुळे झाली कठोर कारवाई

आयएएस (प्रोबेशन) नियम १९५४ च्या नियमानुसार, प्रोबेशनरी अधिकाऱ्यांचा नियोजित कालावधी संपल्यावर त्यांची गुणवत्ता तपासली जाते. पूजा खेडकर यांनी या नियमानुसार दिलेल्या संधींचा गैरवापर केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यूपीएससीनेही खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता.

फसवणुकीच्या आरोपांवरून केंद्र सरकारची कारवाई

खेडकर यांनी ओबीसी आणि दिव्यांगता प्रमाणपत्राच्या आधारावर यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत पात्रता मिळवली होती, परंतु या दोन्ही प्रमाणपत्रांमध्ये फसवणूक आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खेडकर यांच्यावर कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता त्यांच्यावर अटक होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आणि राज्य प्रशासनाची कठोर भूमिका

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सध्या त्या अंतरिम जामिनावर आहेत, पण दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज UPSC आणि दिल्ली पोलिसांनी विरोध केला आहे. आयोगाने कोर्टात स्पष्ट केले की, "पूजा खेडकर यांनी आयोग आणि जनतेची फसवणूक केली आहे."

पूजा खेडकर यांची IAS सेवेतून बडतर्फी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कडक कारवाईचे स्पष्ट उदाहरण आहे. त्यांच्या फसवणुकीच्या आरोपांमुळे खेडकर यांची IAS सेवेतून तात्काळ बडतर्फी करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने